Posts

Showing posts from April, 2020

निश्यबद्ध

#निशब्द दुपारचे १:४५ वाजताची वेळ.. दुकान बंद करणार इतक्यात एक आजीबाई दुकानाच्या काचेतून डोकावत म्हणाली "तांदूळ हायेत का"?  मी म्हटलं "आहेत.." "किती रूपे? तिने विचारलं..  तिच्याकडे पहात क्षणभर गोंधळून जात मूळ किंमतीपेक्षा कमी किंमत सांगत मी ३५ रूपये किलो म्हणालो..  "दोन किलो दे.." असं म्हणत कमरेत खोचलेले पैसे काढू लागली.. पण ६० रूपयेच निघाले..  "दा रूपे कमी हायेत.. देते हा बाबू..." असे म्हणत दुकानाच्या दारातच बसली.. हातातल्या प्लॅस्टिकच्या पिशवीमधून १०० च्या दोन नोटा आणि १० च्या एक दोन नोटांची सुरळी बाहेर काढत मला देणार... ईतक्यात..  माझ्या डोक्यातला गोंधळ हा चालूच होता.. मी तिच्याकडे पाहतच होतो..  कळकट चेहरा.. चेह-यावरच्या सुरकुत्या.. हा आयुष्यातला प्रचंड संघर्ष तिच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत होता..  मी थोडा नर्व्हसच झालो होतो.. दुकानातला माझा सहकारी प्रताप.. त्याला म्हणालो ..यार मी पैसे नाही घेत हिच्याकडून.. त्याने लागलीच होकार कळवला.. मी सुखावलो आणि म्हणालो.. "मावशी पैसे राहू दे.." "का रे बाबू...? पैसे घे....." ती म्हणा...

stugle of life

*भर समुद्रात ४३८ दिवस एकाकी राहून जिवंत परतलेला जोस साल्वादोर अल्वारेन्गा* अत्यन्त प्रतिकूल अशा परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी सर्व उपाय खुंटलेले आहेत आता आपले अस्तित्व पुढे टिकवून ठेवणे, जगणे अशक्य आहे अशा प्रसंगांमधून जेव्हा माणसे जिवंत परत येतात आणि सामान्य जीवन जगतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.  जोस अल्वारेंगा या मच्छीमाराची कथा अशीच आहे.    एका मेक्सिकन मच्छिमाराची बोट समुद्रामध्ये भरकटल्यानंतर त्याच्या जवळ खाण्यापिण्यासाठी होते फक्त कासव, समुद्रपक्षी, मासे, पावसाचे पाणी आणि स्वतःचे मूत्र! जोस अल्वारेंगा हा अनुभवी मच्छिमार होता. त्याने आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे समुद्रामध्ये मासेमारी करण्यात घालविली होती. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी तो कॉर्डोबा नावाच्या एका नवशिक्या सहकाऱ्यासोबत बोट घेऊन प्रशांत महासागरामध्ये मासे पकडण्यासाठी निघाला. ह्या दोघांनी पुढच्या २-३ दिवसांसाठी लागणारी सामग्री बरोबर घेतली होती. मासेमारीला सुरुवात करून अवघे काही तासातच त्यांनी ५०० किलोहुन अधिक मासळी पकडली. दोघेही खूप खुश होते. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. अचानक भयंकर वादळ...