प्रिय सौ
💓 *प्रिय सौ.तुला वजा केल्यावरती मागे काही उरेल काय ?*💓 माझ्या ऑफीसमधले शिंदे बायकोवर नेहमी वैतागलेले असतात आणि म्हणत असतात.. 'सारखी वॉच ठेऊन असते म्हणे माझ्यावर,' ऑफीसमध्ये मी कितीही कामात असलो तरी एकदा तरी फोन केला पाहिजे असा तिचा दंडक आहे ! मी फोन करायला विसरलो तर तिचा फोन येणार, घरी यायला उशीर झाला तर लगेच मोबाईल वाजला म्हणून समजा. ‘कुठे आहात ? ट्रेन चालू आहेत ना व्यवस्थित ? बाहेर काहीतरी खाऊन घ्या. तुमची शुगर कमी होते ना ?’ मित्रांबरोबर पिकनिकला निघालो की, हिने लेक्चर लावलंच म्हणून समजा ! वैताग नुसता…!. मी म्हटलं, ‘शिंदे साहेब, आपली कुणीतरी काळजी करतंय, ही जगण्याचा विश्वास देणारी किती सुंदर भावना आहे हो ! एक चित्र डोळ्यासमोर आणा, एक दिवस तुमच्या विश्वातून तुमची बायको डिलीट झालीय, मग लक्षात येईल ! सकाळी उठून गरम चहा करुन द्यायला कुणी नाहीये ! स्वत:चं वेळापत्रक सांभाळून पोळीभाजीचा डबा भरून द्यायला कुणी नाहीये ! घरी यायला उशीर होणार होतो तेव्हा बाहेर काहीतरी खाऊन घ्या, शुगर कमी झाली तर चक्कर येईल असं व्याकुळ होऊन सांगायला कुणी नाहीये ! आपण करुन ठेवलेला पसारा आ...